भारतीय राज्यघटना व प्रचलित समाजव्यवस्था
भारताला स्वतःची राज्यघटना हवी अशी मागणी प्रथमतः १९२२ साली म. गांधी यांनी केली. त्यावेळी आणि त्यानंतरसुद्धा अनेकवेळा ब्रिटिश सरकारने ती फेटाळली. पेब्रुवारी १९४६ मध्ये ज्यावेळी नाविकांनी बंड केले. त्यावेळी सैन्य आता आपल्या ताब्यात राहणार नाही याची ब्रिटिशांना खात्री पटली आणि मे १९४६ पासून भारताला स्वातंत्र्य देण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर डिसें. ४६ मध्ये भारताची घटना …